Author Topic: २ } राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.  (Read 686 times)

Offline ravindra909

  • Newbie
  • *
  • Posts: 15

२२ प्रतिज्ञा
 २ }  राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

बहुजन  बांधावा तुला केल मूर्ख यांनी कथा या लिहून
महाभारत रामायण काय सांगते घ्यावे जरा पाहून
सीतेमुळे रामायण घडले केवळ लिखाणात सत्यात काही घडलेच नाही
म्हणून मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही ।। धृ ।।
रामाची गोष्ट खूपच मनोरंजक देव असून लाचार दिसला
ब्राह्मणाचा गुलाम इथे विष्णूचा अवतार पाहिला
बहुजनाच्या जीवावर शुद्र म्हणून कोपला
असा राम आमच्या साठी आम्ही कधीच मारला
आता आमच्या कडे बुद्ध आहे काल्पनिक देवांची गरज नाही
म्हणून मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही  ।। १ ।।
नारी जातीची जिथे विटंबना होते तिथे रामायण घडते
नारी जातीचा जिथे सन्मान होतो तिथे स्वराज्य निर्माण होते
रामाचा दिवस जातो जनानखाण्यात त्याच्या वासनेत विकृती दिसते
स्त्रीला बसवून राजगादीवर राज्य चालवणारे शंभू राजे आलम दुनिया पाहते
अश्या रामाचा स्त्रीने आदर करायचे गरजच नाही
म्हणून मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही   ।। २ ।।
कृष्णाची तर रासलीला वर्णन रसभरीत असते
वाचताना  देखील मानवी मनाला  लाज आज वाटते
श्रीकृष्णाने केलेल्या कृत्याचे आज गुण गायले जाते
कोणाच्या आया बहिणींची इज्जत लुटणे यांचे नेहमीचे काम असते
अश्या कामदेवांची आज काही कमी नाही
म्हणून मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही  ।। ३ ।।
रणांगणावर गीता अर्जुनाला कृष्णाने सांगितली
गंमत भारी वाटते यांची ती रणांगणावर कुणी बरे लिहिली
पराक्रम कृष्णाचा  चोरटेपणाचा  लोक दरवर्षी साजरा करू लागली
दहीहंडीत पडणाऱ्या ची या कृष्णाला कधी कीव  नाही आली
अश्या  बिनकामाच्या देवांचा बहुजनाला काही उपयोग  नाही
म्हणून मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही  ।। ४ ।।
का दिली तुम्हाला हि प्रतिज्ञा समजून एकदा घ्यावी
बाबासाहेब यांच्या दृष्टीतून आपली बुद्धी जरुर पहावी
तुमच्या प्रगतीसाठी तुमची तयारी असावी
बाबासाहेबांच्या विचारांची चार लेकरे दिसावी
असल्या देवधर्माच्या गोष्टीची आम्हाला काही  गरज नाही
म्हणून मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही   ।।। ५ ।।

भीमरत्न सावंत