***** एखादाच असतो *****
नशीबवान तर सगळेच असतात |
नशिबाला बदलणारा एखादाच असतो ||
हसतमुख तर सगळेच असतात |
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो ||
मर्त्य तर सगळेच असतात |
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो ||
चमकणारे काजवे बरेच असतात |
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो ||
सुखाचे सोबती सर्वच असतात |
दु:खाचा साथीदार एखादाच असतो ||
अनुभवाने शहाणे बरेच असतात |
अनुभवालाही शहाणा करणारा एखादाच असतो ||
जाळणारे बरेच असतात |
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो ||