Author Topic: *** माझं काव्य समर्पण ***  (Read 666 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 231
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
*** माझं काव्य समर्पण ***
« on: August 24, 2015, 03:28:37 PM »
*** माझं काव्य समर्पण ***

शब्दांच्या इवल्याशा रोपट्याला,
आम्ही कविता केल्या अर्पण..
त्याचंच आज वटवृक्ष झालंय,
असं माझं काव्य समर्पण..!!

आज मी एक कवी झालो,
याचं श्रेय तुम्हालाच अर्पण..
कवीमनाला पंख फुटवणारं,
असं माझं काव्य समर्पण..!!

माझ्या स्वप्नांचं हे व्यासपीठ,
जणु कवीमनाचे एक दर्पण..
स्वप्नपुर्ती करणारच सर्वांची,
असं माझं काव्य समर्पण..!!

माझ्या हक्काचं हे व्यासपीठ,
कविता करतात माझ्या जतन..
उद्या असेल आमचंही प्रकाशन,
असं माझं काव्य समर्पण..!!

अरे मित्रा गरुडझेपच काय,
झेप असेल अंतराळगगण...
कवितांचीच दुनिया वसवेल,
असं माझं काव्य समर्पण...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
(धनराज होवाळ)
पलुस, जि. सांगली
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता