Author Topic: ** करा लेखनीच तलवार **  (Read 675 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
** करा लेखनीच तलवार **
« on: June 29, 2015, 11:48:20 PM »
* करा लेखनीच तलवार *
***************************
मांडुन दुःख उपेक्षितांचे
विद्रोह करणार आहे
लावुन धार लेखनीला
तीची तलवार करणार आहे

दाभोळकर पानसरे विचार
जीवंत ठेवणार आहे
फुले शाहु आंबेडकर
माणसात पेरणार आहे
उठा आता तरुणानो
लेखनीचाच आधार आहे
लावुन धार लेखनीला
तिची तलवार करणार आहे

पुरोगामीच्या या लढ्यात
तुम्ही साथ मला देणार का
पहिला वार करेन मी
तुम्ही ढाल माझी होणार का
पुरोगामीचा हा लढा
पुन्हा उभारणार आहे
लावुन धार लेखनीला
तिची तलवार करणार आहे
***************************
रविंद्र कांबळे पुणे 9970291212

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
Re: ** करा लेखनीच तलवार **
« Reply #1 on: July 01, 2015, 05:36:12 PM »
कांबळे सर नक्कीच बनू तुमची ढाल .

खूपच अप्रतिम कविता ..