कलाम साहेब तुम्ही आमच्यासाठी,
एक प्रेरणा होऊन गेलात।
या स्पर्धाविश्वात चालण्याचा,
विश्वास तुम्ही देऊन गेलात॥
कलाम साहेब तुम्ही आमच्यासाठी,
एक प्रेरणेची मशाल होऊन गेलात।
या स्पर्धेच्या अंधारात चालण्यासाठी,
रस्ता तुम्ही दाखवून गेलात॥
कलाम साहेब तुम्ही आमच्यासाठी,
एक आदर्श शिक्षक बनुन गेलात।
यशोशिखर सर करण्याची,
ताकद तुम्ही देऊन गेलात॥
साहेब कलाम तुम्हा,
शत:शाह प्रणाम।
साहेब कलाम तुम्हा,
शत:शाह सलाम॥
<=दिपक सैँदाणे
करणखेडे,ता.अमळनेर, जि.जळगांव
भ्र.क्र.:9975854669