Author Topic: * शब्द म्हणजे हुकूम माझा *  (Read 861 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 231
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
मी कधीच अडलो नाही,
मी कधीच रडलो नाही..
त्या केर कचऱ्‍यासारखा,
कधी कोपऱ्‍यात सडलो नाही..!!

स्नायू मजबूत नव्हते,
परी लक्ष मजबुत होते..
पंख नव्हे मित्र हो,
कष्ट भरारी घेते..!!

अडखळलो अन् पडलो,
तरी पुन्हा उभा राहीलो..
माझ्या ध्येय सरीतेत,
मी प्रवाहासंगे वाहीलो..!!

मान अपमानाची बातच नव्हती,
मी होतो कणखर प्रश्न..
स्वतःच्याच कामगिरीवर,
होते स्वतःचेच पोटप्रश्न..!!

अश्रूंना मी सांगितलेलं,
माझ्या स्वप्नांच्या आड येऊ नका..
वादळात तरुन जातीलच,
ध्येयाच्या साऱ्‍या नौका..!!

आज परीनाम त्याचा असा,
शब्द म्हणजे हुकूम माझा..
या प्रजेसाठी असतो ना,
तसाच आज मी आहे राजा..
तसाच आज मी आहे राजा..!!
-
प्रेमवेडा राजकुमार

(धनराज होवाळ)
9970679949