एकांत..........!!!!
एकटेपण बोचतं, असे सारेच म्हणतात.
एकटेपण मला सुखावत, म्हणून सारे वेडयात काढतात.
त्यांना काय कळणार?
एकटेपणात मनाने दिलेली साथ
त्याच्याच सल्ल्यानुसार मी केलेली प्रसंगावर मात,
त्यांना कस उमजणार?
एकटेपणात मन माझं बोलत,
माझ्या सारया वेदनांवर हळुवार फुंकर घालत!!!
- कवयित्री भक्ती बर्वे