Author Topic: माझ्या भीमाचीlलेखणी  (Read 642 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
माझ्या भीमाचीlलेखणी
« on: June 18, 2015, 07:55:14 PM »
होती ईमानी नव्हती बेईमानी
भरली साऱ्याच्या मनी
मर्दानी होती मर्दानी
माझ्या भीमाची लेखणी !!

होती शिवबाची तलवार
होती जोतिबाची वारसदार
आली मैदानी आली मैदानी
दुश्मना मारिले रणी  !
मर्दानी होती मर्दानी
माझ्या भीमाची लेखणी !!

मुक्या मुखात आले बोलं
कळले साऱ्याला तिचे मोलं
होती दुश्मन किती दुश्मन
लीन झाले तिच्या चरणी !
मर्दानी होती मर्दानी
माझ्या भीमाची लेखणी !!

बदलला महाराचा तिने वेष
घटनेने तारीला भारत देश
झालो माणूस मी माणूस
जेंव्हा आली ती माझ्या जीवनी !
मर्दानी होती मर्दानी
माझ्या भीमाची लेखणी !!


जय भीम
कवी - संजय बनसोडे
9819444028

Marathi Kavita : मराठी कविता