परवाच एक movie पाहिला.. एका Rockstar चा movie!!
popcorn खात खात रीळ पुढे जात होती
आणि तो hero बोलून गेला
मी तर पाहत होतो निवांत
पण मन अगदी शिवून गेला
झाला होता हैराण, बोलत होता वैतागून
गातोय जरी दिलखुलास, तरी मी जळतोय आतून
असं का होतंय
दुसऱ्यांना काही देताना
मी का मरतोय..
मग जरा थांबलो
movie सरकत राहिला पण मी जरा पांगलो
त्याचा हा problem जरा ओळखीचा वाटला
अर्रे.. होच की
हि तर दुनियेची रीतच निघाली
एका हाताने देऊन दुसऱ्याने पोळी आणली
2 line विरहाने जशी माझी माती खणली
देतानाचा त्रास ही साहजिक गोष्ट निघाली
मग म्हटलं जाऊ दे
हा काही problem नव्हता
काहीतरी द्यावंच लागणार, त्याला कुणीच चुकणार नव्हता
आणि एक खरं सांगू का.. एक आतलं माझं म्हणनं
जोवर आपलं देणं आहे तोवरच आपलं जगणं
काहीतरी देत राहायचं, नाव आपलं कोरत राहायचं
त्याचं मिळणारा credit, डोळे मिचकावून टिपत राहायचं
हां.. तर माझा picture मध्येच राहून गेला
आवाज दिला पुढच्याला, जरा.. ह्या बाजूला..

- रोहित