Author Topic: आपल्या आयुष्यात.. New video  (Read 3301 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
आपल्या आयुष्यात.. New video
« on: October 07, 2012, 11:08:31 PM »

Please Click on this

http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/new-video.html

आपल्या आयुष्यात ...

आपल्या आयुष्यात जागोजागी पूर्णविराम आहेत
प्रसंग प्रसंगाला ते द्यावे लागत आहे ---दिले गेले आहेत ।
प्रसंगाप्रमाणेच पूर्णविराम
भावनांना, विचारांना, घटनांना
सुखाला,दुःखाला तसेच वेदनांना दिले  आहेत
जीवनांतील प्रश्न चिन्हां पुढेही
पूर्णविरामच आहेत
कारण त्यामागील प्रश्नांची उत्तरे
अजूनही अर्धवट लोंबकळत आहेत
टिंब-टिंब-टिंब मिळून रेघ बनते
जीवन म्हणूनच फक्त लकीर वाटते
अर्थहीन -दिशाहीन
फक्त पुढे सरकणारी
काळाच्या ओघाबरोबर                                       
फक्त क्षितिजापर्यंत  जाणारी
ह्याच रेघेत भावना अन  प्रसंग
गुंफले गेले आहेत   
आणखीही अनेक येणार आहेत
तसेच पूर्णविराम रहाणार आहेत---दिले जाणार आहेत ।।
रविंद्र बेंद्रे
« Last Edit: October 07, 2012, 11:10:41 PM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Nitin Tanawade

 • Guest
Re: आपल्या आयुष्यात.. New video
« Reply #1 on: October 08, 2012, 04:25:12 AM »
थाेडक्यात काय तर शब्दांची शाब्दीक सांगड घालायची. अन जात्यावरच्या सुंदर आेवीना आठवायचे.. ज्या ऐकायला कानांना बरे वाटते.. समजायला जरी त्या किचकट असल्यातरी.. जात्यांनी आपल दळणाचं काम करायचं अन दाण्यांनी नुसतं भरडायचं.. फक्त भरडायचंत.. कानाला ऐकु येणार्या जात्यावरच्या सुंदर आेव्यांत...

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आपल्या आयुष्यात.. New video
« Reply #2 on: October 08, 2012, 12:37:49 PM »
chan kavita...

Offline Vaishali Sakat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 161
Re: आपल्या आयुष्यात.. New video
« Reply #3 on: November 02, 2012, 02:05:37 PM »
chan aahe kavita....