Author Topic: .........असे आमचे दादा  (Read 1856 times)

Offline avi10051996

  • Newbie
  • *
  • Posts: 27
  • Gender: Male
.........असे आमचे दादा
« on: November 23, 2012, 09:00:07 PM »
.........असे आमचे दादा

रोज पडत्या स्वप्नापलीकडे ..डोकावून पाहणारे
पानगळीतहि झाडाला ...हिरव्या आशेने हाताळणारे
त्यांनी दिलेले जीवन ...कसे जगावे सांगणारे
.........असे आमचे दादा

वाळवंटातहि सुखांचा ...तळ साचवू पाहणारे
पावसाळी पडत्या थेंबी... मन ओलावून टाकणारे
त्यांनी दिलेले जीवन ...कसे जगावे सांगणारे
.........असे आमचे दादा

दूर दूर पठारीत ...जीवन शिखरी उंचावणारे
दलदलीत आयुष्य तरी...मातीत सोने पिकवणारे
कोरड्या पापणीतही...डोळ्यांना सुखावणारे
त्यांनी दिलेले जीवन ...कसे जगावे सांगणारे
.........असे आमचे दादा

माझ्या काटेरी जीवनाला ...नेहमी पिसावून बघणारे
थकल्या देही सखे खांदी ...नेहमी विसावणारे
कायम जागृत नयनी...शांत,संयमी राहणारे
त्यांनी दिलेले जीवन ...कसे जगावे सांगणारे
.........असे आमचे दादा

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: .........असे आमचे दादा
« Reply #1 on: November 26, 2012, 01:06:18 PM »
chan kavita