Author Topic: प्रवास आयुष्याचा....  (Read 3859 times)

Offline Sameer Nikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 51
  • Gender: Male
  • Sameer Nikam
प्रवास आयुष्याचा....
« on: November 27, 2012, 10:21:20 PM »
प्रवास आयुष्याचा वळणा वळणाचा
सुख दुःखाच्या उतार चडीचा

नाही ठाव पुढल्या ,वळणा नंतरचा
करी सामना निर्भयतेने, येणाऱ्या संकटाचा

मिळती अनुभव, गोड कडू आस्वादाचा
येती त्यानेच बळ, निर्धास्त पणे पुढे जाण्याचा   

वाटेत आहेत खड्डे, भर भरूनी
मिळेल  सुखं, दुःखाची कात टाकुनी

सहज सरळ सोप्पा वाटे हा रस्ता
पण कधी न संपणारा, आहे हा घाटरस्ता

समीर सु निकम

Marathi Kavita : मराठी कविता