Author Topic: माणूस म्हणून जन्म घेतला...माणूस म्हणूनच मरायला हवे.....  (Read 3425 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
जीवनात थोडेतरी प्रेम दुसऱ्यावर करायला हवे
कोणावरही करा गुलाबावरच का काट्यांवरही करा
खाच खाळग्यांनी भरलेल्या वाटांवर करा
आनंदात सगळेच जगतात दुखातही जगायला हवे
जीवनात थोडेतरी प्रेम दुसऱ्यावर करायला हवे...!!१!!

माणसे माणसांना मारतात
स्वताच्या सुखासाठी नको ते करतात
तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा
हेच आता घडायला हवे
जीवनात थोडेतरी प्रेम दुसऱ्यावर करायला हवे...!!२!!

हे मला हवे ते मला हवे
पैश्याच्या माजावर काहीही विकत घ्यावे
गरिबाने मग कुणाकडे आणि कुठे जावे
स्वतःसाठी सगळेच जगतात
इतरांसाठीही जगायला हवे
जीवनात थोडेतरी प्रेम दुसऱ्यावर करायला हवे...!!३!!

पैसा पैसा करत राहावे
लोभापायी मग शील हि विकावे
हे असले भिकार वागणे
आतातरी सोडायला हवे
जीवनात थोडेतरी प्रेम दुसऱ्यावर करायला हवे...!!४!!

माणूस म्हणून जन्म घेतला
माणूस म्हणून जगलो
तर आता...
माणूस म्हणूनच मरायला हवे...
माणूस म्हणूनच मरायला हवे...   
जीवनात थोडेतरी प्रेम दुसऱ्यावर करायला हवे...!!५!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush
« Last Edit: December 22, 2012, 10:31:56 AM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Arti Pandit

 • Guest

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Arti ji...
... Khup abhar agadi manapasun.