Author Topic: आशावाद...  (Read 2096 times)

Offline abhishek.dhapare

  • Newbie
  • *
  • Posts: 6
आशावाद...
« on: December 23, 2012, 03:10:19 PM »
कर्तुत्वाची खान असुनी
सुखास मुकति प्रजा...

कार्तुत्वानांचे कौतुक सोडूनी
स्वतःचे पोट भरतोय राजा...

राज्याचे वाजलेत बारा
राज्यकर्ते वाजवतायेत बाजा...

भाषावाद, प्रांतवाद यातच
पेंड खातय आमचं घोडं...

असेल थोडी लाज
तर ऐका जनतेचं थोडं...

बरी नव्हं एवढी
पैशाची ओढ...

नका पाहू अंत
आता जनतेचा...

नक्की येईल एकदातरी
पूर ज्ञानाचा...

हा देश नक्की होईल
पुन्हा सज्जनांचा, वीरांचा....

हा आशावाद आहे आम्हा सर्वांचा....

-अभिषेक प्रमोद ढापरे, पुणे
९९२३०९२७३९

Marathi Kavita : मराठी कविता