Author Topic: जीवन एक गाणे  (Read 2507 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
जीवन एक गाणे
« on: December 28, 2012, 01:38:59 PM »
रवींद्र जी,
तुमच्या जीवन एक कोडे  ह्या कविते वरून सुचलेली “जीवन एक गाणे” कविता (थोडी positive)
 
 
जीवन हे एक गाणे आहे
कधीही  न संपणारे
जीवन एक फुल आहे
सतत उमललेले

जीवन हे धूप आहे
प्रसन्न सुवास पसरवणारे
जीवन हे मेण आहे
मऊ मुलायम विरघळणारे

जीवन हे प्रेम आहे
जगायला लावणारे
व्यवहारी जगातही
आपलेपण टिकवणारे

जीवन हे स्वप्न आहे
हव ते दाखवणारे
जाग येताच त्या ध्यासानी
धावायला लावणारे

जीवन हे आभाळ आहे
विशाल पसरलेले
क्षितिजावर कायम
इंद्रधनू पसरलेले.


केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
Re: जीवन एक गाणे
« Reply #1 on: December 28, 2012, 02:04:20 PM »
फारच छान बोल आहेत  ...keep it up...
Sadhana