Author Topic: शांती नांदेल संसारात...  (Read 1419 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
शांती नांदेल संसारात...
« on: January 29, 2013, 12:29:40 PM »
समजेना अजुनी मजसी
   असे काय ही जग रिती
आपुला फक्त बाब्या अन
   का दुसर्याचे कार्टे म्हणती ।
जगी शिकविती संत सारे
   मानव असती एक समान
प्रेम करा सर्वां वरती 
   राखुनी प्रत्येकाचा मान ।
परि जगाची रितच न्यारी 
   पदोपदी दृष्टी पडते
कुणावरती प्रेम करुनी 
   अन्यांचा दुश्वास करते ।
स्त्री जातीचा असे दाखला 
   उदाहरण उत्तम सासूचे
करते प्रेम जावयावरी परी 
   सुनेशी सदा वाकडे तिचे ।
लग्न करती पुत्राचे 
   वाढविण्यासत्त्व वंशवेल
परी वेलफुलविणाऱ्या
   सुनेचा करती सदा हाल ।
होताच लग्न म्हणती सर्व 
   घरची लक्ष्मी आली घरी
लग्नास दिन होता चार लक्ष्मीस
   विसरुनी जाती परी ।
होते मग लक्ष्मी घरची 
   घरात मोफत मोलकरीण
आणि सदादीत वदते सासू
   घरात आली दावेदारीण ।           
गोष्ट आगळी जावयाची 
   तत्पर सासू तैनातीला
गुण सर्व पणी लावी 
   खुश करण्या जावयाला ।
का दिसते रित अशी 
   देशाच्या घराघरात
गूण दिसती जावयात अन
    दुर्गुण दिसती फक्त सूनेत ।
होती सून सासू आधी 
   स्त्रीस त्याच का विसर पडे
अनुभविलेल्या हाल अपेष्ठा 
   दुसर्यांस देण्या सदा धडपडे ।
गूढ असल्या स्त्री हृदयाचे
   अजुनी नच पूर्ण उलगडे
विचार करितो सदैव परि 
   उत्तर त्याचे न अजून सापडे ।
दाखवील का अपवाद कुणी
   वर सांगितल्या नात्यात
असतील असे अपवाद तर 
   शांती नांदेल संसारात ।
।रविंद्र बेन्द्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/01/blog-post_22.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: शांती नांदेल संसारात...
« Reply #1 on: January 29, 2013, 05:35:29 PM »
saty paristhiti