Author Topic: जीवन एक स्वप्न  (Read 3433 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
जीवन एक स्वप्न
« on: January 30, 2013, 08:16:20 AM »
जीवन एक स्वप्नआहे
भावनांचा खेळ आहे
   कल्पनांचा पसारा आहे
त्यांत मानव डुंबत आहे
   बालपणी स्वप्न दिसतात
तेव्हां ती खरी वाटतात
   परि त्यांना मर्यादा आहे
तरुणपणाची स्वप्नं काहीं
   त्याला काहीं बंधन नाहीं
नभाला गवसणी घालत आहे
   काही भयानक असतात
गोड काहीं हवीशी वाटतात
   त्यावरच तारुण्य जगत आहे
धरणाला जी दारे आहेत
   भरले पाणी सोडत आहे
त्यामुळे ते सुरक्षित आहे
   भावनांना तशी स्वप्ने आहेत
मनमोकळे करीत आहे
   त्यामुळेच  मानव स्थिर आहे
शास्त्र काहीं सांगत असले
   स्वप्नांचा अर्थ लावत असले
तरी स्वप्न मनाचा खेळ आहे
   जीवन सुखी करत आहे

रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/01/inspirationalaudio.html

Marathi Kavita : मराठी कविता