Author Topic: आईचा गोडवा  (Read 2993 times)

Offline ♥ shashi B Kavita ♥

  • Newbie
  • *
  • Posts: 13
आईचा गोडवा
« on: February 04, 2013, 07:37:19 PM »
आईचा गोडवा
 
आई माझी अमृतासारखी गोड
तिच वागणं पण गोड बोलणं पण गोड
गोड गोड गोड आई माझी गोड

तिचा आशिर्वाद गोड,तिची शिकवण पण गोड
तिचा चेहेरा पण गोड ,तिचं  हास्य पण गोड गाई
गोड गोड गोड आई माझी गोड

तिचा साधेपणा गोड ,तिचं बघणं  पण गोड
तिचा ऒरडणं गोड ,तिचं अस्तित्व गोड
गोड गोड गोड आई माझी गोड

तिचं अंगाईगीत गोड तिचे संस्कार पण गोड
स्वागत करणं पण गोड ,निरोप देणं पण गोड
गोड गोड गोड आई माझी गोड

तिचं दूध पण गोड ,कुरवळणे पण गोड
तिचं जेवण पण गोड ,जेवण वाढणं पण गोड
गोड गोड गोड आई माझी गोड

तिचे कडू शब्द गोड ,समजूत  घालणं पण गोड
तिचा  प्रेमळ स्वभावपण गोड तिचा स्पर्शपण गोड
गोड गोड गोड आई माझी गोड
« Last Edit: February 04, 2013, 07:40:19 PM by shashi1969bele »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: आईचा गोडवा
« Reply #1 on: February 05, 2013, 09:48:40 AM »
खरच आईचा गोडवा अवीट असतो.
मनापासून कविता लिहिलेली आहे, असे वाटते.
मस्त!