Author Topic: उनाडलेल्या शब्दांना  (Read 2086 times)

उनाडलेल्या शब्दांना
« on: February 09, 2013, 07:50:15 PM »
उनाडलेल्या शब्दांना,
 सारे निशब्द जानवे
वाट शब्दांनीही बघावी
शब्दात निशब्द्लेल्यांची

वादळातील कणांना
वेड उंच उडण्याचे
वाट कणांनीही बघावी
स्वताच्या अधपतनाची

डोंगरातील काजवांना
वेध प्रकाश गीताचे
वाट काजवानीही बघावी
क्षितीजातील किरणांची

उधळलेल्या भावनांना
मार्ग सारे सारखेच
वाट भावनानीही बघावी
मानूस्मृतीत परतण्याची

डोळ्यातील आसवांना
माणूस पोरका जाणावे
वाट आसवानी बघावी
बुढाईच्या जन्मण्याची

Marathi Kavita : मराठी कविता