Author Topic: हिरव्या पानां आड  (Read 1812 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
हिरव्या पानां आड
« on: February 15, 2013, 08:38:11 AM »
हिरव्या पानां आड   
   मोगरा जरी लपला
त्याचा मंद मधूर गंध
   आसमंतात पसरला ।
चंद्रबिंब आकाशीचे 
   मेघाआड लपले गेले
त्याचे मोहक चांदणे
   तेथूनही रिझवित राहिले ।
छातीच्या आवरणामागे 
   मन जरी लपले असते
तेथूनच ते प्रीतिचे  भाव
   निर्माण करीत असते ।
देव अदृष्य असला तरी
   त्याचे अस्तित्व जाणवते
त्याच्याच इशार्याने  कारण
   जगरहाटी चालत असते ।।

                             रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/02/inspirational_7.html

Marathi Kavita : मराठी कविता