Author Topic: ते म्हणजे बाप अन् आई.  (Read 2588 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
ते म्हणजे बाप अन् आई.
« on: February 25, 2013, 04:58:59 PM »
बाळा भरवितात घास
स्वतः राहुन उपाशी,
ते म्हणजे बाप अन् आई.

मुलांना शिकवी
रक्ताची करुनी शाई,
ते म्हणजे बाप अन् आई.

बाळाचे लाड पुरवी
स्वतःच्या इच्छांना देवुन फाशी,
ते म्हणजे बाप अन् आई.

स्वतः जमिनीवर झोपी
बाळा देवून गादी,
ते म्हणजे बाप अन् आई.

बाळा ठेवण्या सुखी
स्वतः दिस रात कष्टी,
ते म्हणजे बाप अन् आई.

Marathi Kavita : मराठी कविता