Author Topic: आई  (Read 2156 times)

Offline Vikas Vilas Deo

 • Jr. Member
 • **
 • Posts: 65
आई
« on: March 04, 2013, 11:18:32 AM »
अपार तिचे कष्ट
अपार तिची माया
विश्वाची ती देवता
ती प्रेमाची छाया

चंदनासारखे झिजून
सुगंध घराला देते
प्रांज्वल मनाची आई
घरात ईश्वर बनून येते

स्वार्थ नसतो जगण्यात
ती निस्वार्थी जीवन जगते
ती घरात असल्याते
घर नेहमी गजवजते

तिच्या ममतेचा पदर
हवाहवासा वाटतो
दुःख असले तरीही

तो क्षण सुखद वाटतो

तिच्या वात्सल्याची
कुठेही नसते सिमा
तिच्या प्रेमाचा माठ
कधी होत नाही रिकामा

अशी असते आई
तिचे दीपा सारखे जीणे
स्वतः जळत राहून
इतरांना प्रकाश देणे.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ashwini thite

 • Newbie
 • *
 • Posts: 36
 • Gender: Female
 • Aashu Thite
Re: आई
« Reply #1 on: March 04, 2013, 03:05:17 PM »
खूपच  छान ..................

स्वतः च्या डोळ्यातले पाणी
लपवत राहते न बोलता जसे
कोणासाठी तरी ती हे करते
जमिनीत जसे जिरून साठते पाणी
माया बनून ती मुलांवर लुटवते
आई हि अशीच असते

Offline Vikas Vilas Deo

 • Jr. Member
 • **
 • Posts: 65
Re: आई
« Reply #2 on: March 05, 2013, 04:18:38 PM »
Thanks for your reply.