Author Topic: गुडी उभारू  (Read 1054 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
गुडी उभारू
« on: April 18, 2013, 05:33:13 PM »
नववर्षाच्या गुडी उभारू
नववर्षाचे स्वागत करू

गुडी उभारू संमृद्धीच्या
गुडी उभारू भरभराटीच्या
गुडी उभारू कष्टाच्या
सारयांचे जीवन उज्ज्वल करु

गुडी उभारू नवचेतनाच्या
गुडी उभारू उल्हासाच्या
गुडी उभारू आनंदाच्या
सारे जग प्रफुल्लीत करू

गुडी उभारू स्वातंत्र्याच्या
गुडी उभारू समानतेच्या
गुडी उभारू बंधुत्वाच्या
सारे मानव एक करु

गुडी उभारू मानवतेच्या
गुडी उभारू विश्वबंधुच्या
गुडी उभारू विश्वशांतीच्या
सारे विश्वची आपले करु

गुडी उभारू भूतदयेच्या
गुडी उभारू प्राणीमात्राच्या कल्याणाच्या
गुडी उभारू चेताचेत रक्षणाच्या
नववर्षाला एक नवे विश्व उभारु

Marathi Kavita : मराठी कविता