Author Topic: मनाच्या गाभार्यांत  (Read 1551 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
मनाच्या गाभार्यांत
« on: April 20, 2013, 11:31:27 PM »
मनाच्या गाभार्यांत
स्मृतिंचा दिवा जळतो
जीवनांत भरलेला
अंधार तो दूर करतो ।

जीवनाच्या जमिनीत
स्मृतिंना अंकूर फुटतो
पालवी त्याला फुटून
त्याचा मोठा वृक्ष होतो ।

भावनांच्या क्षितिजावर
स्मृतिंचा चंद्र येतो
शीतल अन ज्योत्स्नेनं
दुःखाची झळ कमी करतो ।

म्हणूनच मनुष्य आपल्या
स्मृतिंना जपत असतो
त्याच्याच आधारे तो
जीवन आपले जगत असतो  ।।रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/04/inspirational.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline अशोक भांगे (सापनाई कर )

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Male
  • वेडी कविता कि वेडा मी , काही नाही फक्त शब्दांच्या चढाओढी
Re: मनाच्या गाभार्यांत
« Reply #1 on: April 20, 2013, 11:33:26 PM »
khupach chhan............