Author Topic: मला कवी व्हायचं आहे  (Read 1267 times)

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
मला कवी व्हायचं आहे
« on: April 22, 2013, 03:22:43 PM »
मला कवी व्हायचं आहे


मला कवी व्हायचं आहे
शब्दांच्या  प्रेमात मलाही पडायचं आहे
खेळायचा  आहे शब्दांचा खेळ
जुळवून ओळींचा मेळ
मांडायचे आहेत डोक्यातले विचार
तोडायचा आहे भावनांचा बांध
फिरायचं आहे शब्दांच्या दुनियेत
पोहायच आहे अक्षरांच्या नदीत
लिहायचं आहे प्रत्येक गोष्टीबद्दल
प्रेम-राग, आशा- निराशा,  सुख- दुखाबद्दल
शब्दकोशातून नवनवीन शब्द शोधायचे आहेत
हर एक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचे आहेत
प्रत्येक कवितेचा विषय वेगवेगळा असेल
पण आवडणाऱ्या विषयाचा नंबर नेहमीच पहिला असेल
कसलाच नसेल भेदभाव न कसली जातपात
भाषा कुठलीही  असली तरीही असेल त्यामागे एकच भाव
कवीसंमेलने मला पण attend करायची आहेत
मैफिलीच्या मैफिली  खूप  गाजवायच्या आहेत
प्रसिद्धीच्या डोहात बुडायचं आहे
एखाद टोपण नाव डोक्यावर मिरवायचं आहे
नवीन नवीन शब्द नवीन नवीन वाक्य
नवीन कवितेबरोबर नवीन श्रोते बनवायचे आहेत
मला कवी व्हायचं आहे
शब्दांच्या प्रेमात मलाही पडायचं आहे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मला कवी व्हायचं आहे
« Reply #1 on: April 23, 2013, 10:55:03 AM »
chan!!!

मला कवी व्हायचं आहे
शब्दांच्या  प्रेमात मलाही पडायचं आहे........

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
Re: मला कवी व्हायचं आहे
« Reply #2 on: May 17, 2013, 12:42:54 PM »
Dhanyawaad