Author Topic: प्रयत्न असेल........  (Read 2482 times)

Offline Shona1109

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
प्रयत्न असेल........
« on: April 22, 2013, 03:26:58 PM »
प्रयत्न असेल........


प्रयत्न असेल परत तुझ्या प्रेमात पडण्याचा
परत तुझ्या छायेत विसावण्याचा
वाट भेटेल त्या गावी भटकण्याचा
तुझ्या प्रेमाच्या पावसात बेधुंद भिजण्याचा
तुला यावच  लागेल ह्याची सतत आठवण करून देण्याचा
परत तुझ्या कुशीत अक्खी  रात्र जागवायचा
तुझा  हलकासा  स्पर्श परत जाणवायचा आहे
मनातला क्षीण क्षणात दूर झुडकारायचा आहे
परत एकदा क्षितीजेच्या पलीकडे जायचं आहे
पाय जमिनीवर ठेवून आकाशाला गाठायचं आहे
मोठमोठ्या कल्पना सुचवता येत नसल तरी
आलेल्या प्रत्येक कल्पनेच सह्खुशीने स्वागत करायचं आहे
माझ्या प्रेमाचा परत एकदा तुला स्वीकार करावा लागेल
माझ्यावरील रुसव्याला तुला दूर साराव लागेल
प्रयत्न असेल साध्यासोप्या  भाषेत तुला मांडण्याचा
नेहमीप्रमाणे वेगवेगळे विषय जपण्याचा
तुझ्यासमवेत सगळ्यांच्या हृदयात परत जागा मिळवण्याचा
शब्दांच्या रुपात तुला परत परत जगण्याचा
केलेल्या प्रयत्नांना सफल होत बघताना
हृदयातल्या कल्पनेला कवितेत मांडताना
श्रोताकडून तुझी वाहवा ऐकताना
तुला मिठीत घायचं आहे
...........

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: प्रयत्न असेल........
« Reply #1 on: April 23, 2013, 10:52:53 AM »
chan प्रयत्न आहे!!! :)