Author Topic: आयुष्याची मजा यावी  (Read 4457 times)

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
आयुष्याची मजा यावी
« on: August 25, 2013, 03:41:00 PM »

असे जगावे आयुष्य कि,
आयुष्याची मजा यावी .
आयुष्यातून कंटाळ्याने,
आयुष्यभराची रजा घ्यावी .

आजंच  आता जगू,
उद्याचं काय ते उद्या बघु.
चिंता जावी अशी काही विसरून,
जसे फुल नकळत गळावे देठापासुन.
हि अवस्था मनाची  इतक्या सहजा व्हावी.

मनात उल्हासाचे इंद्रधनू,
पसरत राहावे क्षणोक्षणी.
आपला उत्साह पाहून,
आनंद व्हावा फुलाच्या मनी.
चैतन्याच्या बेरजेतून उदासीनता वजा व्हावी.

.....अमोल

Marathi Kavita : मराठी कविता