Author Topic: माझी आई......  (Read 3847 times)

Offline paresh

  • Newbie
  • *
  • Posts: 3
माझी आई......
« on: August 25, 2013, 04:04:43 PM »
माझी आई......

खरच का ग आई सात जन्म असतात का ,
आवडत्या मानसं बरोबर पुढचा जन्म मागतात का ?
प्रत्येक सात जन्मी मी सात जन्म मागणार आहे ,
तुमच्याच पोटी येण्या साठी मी एक तरी तप करणार आहे ,

प्रत्येक पुढच्या जन्मी माझी तूच आई व्हावीस ,
आणि जन्म घेण्य आधी मला त्याची माहिती असावी ,
तुझ बोट धरून मी इवल पावलं चालेल ,
इवली इवली पावलं म्हणत प्रत्येक जन्म तुझा बरोबर चालेल ,

ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात मी पाणी बघितला आहे ,
पण तुला हसवण्या साठी मला पुढचा जन्म घ्यायचा आहे ,
आणि देत आला तर पुढचा आयुष्य तुम दोघांना देईल ,
आणि पुढचा जन्म घेई पर्यंत तुमच्या मना मध्ये राहीन ,

म्हणून मी देव कडे हेच मगण मागतो ,
प्रत्येक जन्मी मला माझ्हीच आई मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना मी करतो ,
ह्या जन्मी माझा कडून काही चुकल असेल तर त्याची क्षमा मी देव कडे मागतो ,
आणि देव नंतर आई मी फक्त तुलाच देव मानतो ,

आई तुंझा बद्दल आणखी काय बोलू शब्द अपुरे पडतील आणखी काय लिहू ,
लिहिता लिहिता फक्त एवढेच मी सांगतो ,
माझा आयुष्याच्या शेवत पर्यंत तुझी साठ मी देव कडे मागतो ,
आणि माझे हे शब्द आई मी तुलाच अर्पण करतो ,

                                                   -परेश
« Last Edit: August 25, 2013, 04:07:47 PM by paresh »

Marathi Kavita : मराठी कविता