Author Topic: उठूनं उभी रहा पुन्हा तू  (Read 7378 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
उठूनं उभी रहा पुन्हा तू
« on: August 26, 2013, 10:37:42 AM »
बलात्कार झालेल्या प्रत्येक "स्री" स समर्पित
----------------------------------------------- 
उठूनं उभी रहा पुन्हा तू …………. संजय निकुंभ
===============
उठूनं उभी रहां….  पुन्हा तू
जशी राखेतून ज्वाला
घे कवेत दोन्ही करांनी
पुन्हा या आयुष्याला

किती वेदना जाणतो मी
होतं असतील काळजाला
परि सामोरे जावेच लागेलं
तुला या जगण्याला

कां आयुष्य तुझे संपवावे
कोणता केला तू गुन्हा
नको डोकावू त्या क्षणात
ज्या क्षणाने तुझा घात केला

निष्ठूर , निर्दयी माणसांच्या
जाळ्यात सापडलीस तू
वासनांचा निचरा करण्यास
तुझा वापर त्यांनी केला

अपवित्र झाले , अशुद्ध झाले
असे नको समजू स्वतःला
नितीमत्ता त्यांची लयास गेली
ज्यांनी भोगले शरीराला

आयुष्य असे संपवायचे नसते
जरी बलात्कार झाला
धीट मनाने दे लढा तू
तुझ्यावरच्या अत्याच्याराला

विश्वास ठेव तू स्वतःवर
शिक्षा दे त्यांना कायद्याने
बघं पुन्हा तू नवे स्वप्न
गवसणी घाल नभाला .
==================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २५ . ८ . १३   
 
Marathi Kavita : मराठी कविता

सविता

 • Guest
Re: उठूनं उभी रहा पुन्हा तू
« Reply #1 on: August 27, 2013, 12:45:03 AM »
वरची कविता "बलात्कार झालेल्या प्रत्येक स्री"ला उद्देशून आहे. ती वाचून माझ्या मनात आलेला विचार मी नम्रपणे नमूद करते तो असा -

बलात्कार झालेल्या एखाद्या मराठीभाषिक स्त्रीला "Marathi Kavita" ह्या ब्लॉग्‌चे अस्तित्व मुळात माहीत असण्याची आणि ती दुर्दैवी घटना तिच्या आयुष्यात नुकतीच घडल्यानंतर ’’कर्मधर्मसंयोगाने" ती स्त्री वरची कविता वाचण्याची शक्यता किती आहे?

ही कविता अर्थात्‌ कधीतरी भविष्यकाळात बलात्कार झालेल्या स्त्रीलाही लागू आहे. पण भविष्यकाळात बलात्कार झालेल्या एखाद्या मराठीभाषिक स्त्रीलाही "Marathi Kavita" ह्या ब्लॉग्‌चे अस्तित्व मुळात माहीत असण्याची आणि त्याशिवाय ’Marathi Kavita ह्या ब्लॉग्‌मधे मागे कधीतरी एकदा नोंद झालेली आणि आता आपल्याला लागू असलेली एक कविता आपण वाचली होती’ ह्याची आठवण होऊन ’ती कविता आता आपल्याला लागू असल्याने प्रोत्साहनाकरता आपण ती त्या ब्लॉग्‌मधे परिश्रमपूर्वक धुंडाळून काढून वाचू या’ असा विचार त्या स्त्रीच्या मनात येण्याची शक्यता किती आहे?

ह्या नोंदीच्या सुरवातीला म्हटल्याप्रमाणे वरची कविता वाचून माझ्या मनात आलेला विचार मी वर नम्रपणे नमूद केला आहे.

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: उठूनं उभी रहा पुन्हा तू
« Reply #2 on: August 27, 2013, 02:21:44 PM »
@ संजय एम निकुंभ : तुमची कविता खरंच खूप प्रेरणादायी आहे … ... keep writing such poems ..............

@ सविता : मला वाटतं त्यांनी हि कविता फक्त मराठी भाषिक स्त्रीसाठीच नाही तर जगातल्या प्रत्येक "स्त्री" साठी केली आहे जी बलात्कार पिडीत आहे…........... राहिला प्रश्न त्यांची हि कविता अश्या स्त्री पर्यंत पोहचण्याचा तर त्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ...... इथे पोस्ट केलेली प्रत्येक कविता हि फेसबुक वर हि अपलोड होते.… ज्यांना ह्या कवितेचा आशय कळलाय ते नक्कीच हि कविता फेसबुक / फोरवर्ड इमेल / ब्लॉग वर शेअर करतील आणि हि कविता अश्या स्त्रियांपर्यंत पोहचवतील …

जमलंच तर कवीच्या हि कविता लिहिण्या मागच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

माझ्या ह्या उत्तराने तुमच्या मनात आलेल्या लांबलचक विचारांना पूर्ण विराम मिळेल अशी आशा करते.

सविता

 • Guest
Re: उठूनं उभी रहा पुन्हा तू
« Reply #3 on: August 28, 2013, 08:09:57 AM »
संतोषी,

बलात्काराची आपत्ती कमालीची घोर आहे ह्याबद्दल आणि बलात्कारपीडित स्त्रीला प्रोत्साहन मिळावे ह्याबद्दल दुमत कोणाचे असणार?

आता तुमच्या उत्तराबद्दल थोडे लिहून मी माझी ह्या विषयावरची "चर्चा" पूर्णपणे समाप्त करत आहे.

"मला वाटतं त्यांनी हि कविता फक्त मराठी भाषिक स्त्रीसाठीच नाही तर जगातल्या प्रत्येक स्त्रीसाठी केली आहे जी बलात्कार पिडीत आहे" असे तुम्ही लिहिले आहे.
 
भाषाशास्त्रज्ञांच्या अंदाजाप्रमाणे जगात सद्यः ६,८००हून अधिक लेखी भाषा (आणि ४१,०००हून अधिक बोली भाषा) प्रचारात आहेत. तेव्हा ह्या ब्लॉग्‌मधे निकुंभांची कविता वाचल्यानंतर कोरिअन, स्वाहिली, हंगेरिअन, अरबी, वगैरे, वगैरे "निदान काही" लेखी भाषांमधे विशारद असलेले कोणी (वेगवेगळे) वाचक त्या कवितेचे त्या त्या भाषांमधे भाषांतर करण्याचे परिश्रम करून त्या भाषांमधल्या कुठल्या तरी ब्लॉग्‌मधे आपली भाषांतरित कविता नोंदवतील, आणि त्यानंतर जगातली कोणी बलात्कारपीडित स्त्री ती भाषांतरित कविता वाचेल आणि प्रोत्साहन मिळवेल असे तुम्हाला वाटत असल्याचे तुमच्या वरच्या विधानात अभिप्रेत आहे.

ह्या ब्लॉग्‌मधे निकुंभांची कविता वाचणार्‍या वाचकांची कोणा सांप्रतच्या किंवा भविष्यकाळातल्या बलात्कारपीडित मराठीभाषिक स्त्रीशी ओळख असेल आणि ते वाचक त्या ओळखीच्या स्त्रीला निकुंभांची कविता "फेसबुक/ फॉरवर्ड इमेल/ब्लॉग" वगैरे "पर्यायां"द्वारे पोहोचवतील असे तुमच्या उरलेल्या उत्तरात अभिप्रेत आहे. (विशेषतः भविष्यकाळात तसे घडण्याकरता निकुंभांची त्या विषयावरची एक कविता आपण मागे कधीतरी एकदा "Marathi Kavita"मधे वाचली होती हे प्रथम आठवून त्यानंतर संबंधित वाचकांना ती कविता ह्या ब्लॉग्‌मधे अतिपरिश्रमपूर्वक हुडकून काढावी लागणार आहे!!)

"माझ्या ह्या उत्तराने तुमच्या मनात आलेल्या लांबलचक विचारांना पूर्ण विराम मिळेल अशी आशा करते" असे तुम्ही लिहिले आहे. माझ्या ह्या प्रत्युत्तराने तुमच्या मनात विचारांना जरा चालना मिळेल अशी आशा व्यक्त करून वर लिहिल्याप्रमाणे मी माझी ह्या विषयावरची "चर्चा" आता पूर्णपणे समाप्त करत आहे.

साठां उत्तरांची कहाणी सफळ संपूर्ण!

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: उठूनं उभी रहा पुन्हा तू
« Reply #4 on: August 28, 2013, 04:30:19 PM »
हो मला असेच म्हणायचे आहे … नशीब तुझ्या लवकर लक्षात आले ते ......

"मला वाटतं त्यांनी हि कविता फक्त मराठी भाषिक स्त्रीसाठीच नाही तर जगातल्या प्रत्येक स्त्रीसाठी केली आहे जी बलात्कार पिडीत आहे" असे तुम्ही लिहिले आहे.
 
भाषाशास्त्रज्ञांच्या अंदाजाप्रमाणे जगात सद्यः ६,८००हून अधिक लेखी भाषा (आणि ४१,०००हून अधिक बोली भाषा) प्रचारात आहेत. तेव्हा ह्या ब्लॉग्‌मधे निकुंभांची कविता वाचल्यानंतर कोरिअन, स्वाहिली, हंगेरिअन, अरबी, वगैरे, वगैरे "निदान काही" लेखी भाषांमधे विशारद असलेले कोणी (वेगवेगळे) वाचक त्या कवितेचे त्या त्या भाषांमधे भाषांतर करण्याचे परिश्रम करून त्या भाषांमधल्या कुठल्या तरी ब्लॉग्‌मधे आपली भाषांतरित कविता नोंदवतील, आणि त्यानंतर जगातली कोणी बलात्कारपीडित स्त्री ती भाषांतरित कविता वाचेल आणि प्रोत्साहन मिळवेल असे तुम्हाला वाटत असल्याचे तुमच्या वरच्या विधानात अभिप्रेत आहे.

वाचकांना कविता ह्या ब्लॉग्‌मधे अतिपरिश्रमपूर्वक हुडकून कशाला काढावी लागेल ?… ज्यांना हि कविता आवडली आहे ते वाचक हि कविता आपल्या संग्रही ठेवतील हवी तेव्हा मिळावी म्हणून .......

ह्या ब्लॉग्‌मधे निकुंभांची कविता वाचणार्‍या वाचकांची कोणा सांप्रतच्या किंवा भविष्यकाळातल्या बलात्कारपीडित मराठीभाषिक स्त्रीशी ओळख असेल आणि ते वाचक त्या ओळखीच्या स्त्रीला निकुंभांची कविता "फेसबुक/ फॉरवर्ड इमेल/ब्लॉग" वगैरे "पर्यायां"द्वारे पोहोचवतील असे तुमच्या उरलेल्या उत्तरात अभिप्रेत आहे. (विशेषतः भविष्यकाळात तसे घडण्याकरता निकुंभांची त्या विषयावरची एक कविता आपण मागे कधीतरी एकदा "Marathi Kavita"मधे वाचली होती हे प्रथम आठवून त्यानंतर संबंधित वाचकांना ती कविता ह्या ब्लॉग्‌मधे अतिपरिश्रमपूर्वक हुडकून काढावी लागणार आहे!!)

Offline aspradhan

 • Jr. Member
 • **
 • Posts: 187
 • Gender: Male
 • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: उठूनं उभी रहा पुन्हा तू
« Reply #5 on: August 30, 2013, 05:39:45 PM »
कवितेतील भावना जाणून घ्या . या भावना जन सामन्यापर्यंत पोहोचतीलच . भावना तीव्र असल्या तर भाषेच्च्या सीमा ओलांड्याला वेळ लागत नाही!!!

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: उठूनं उभी रहा पुन्हा तू
« Reply #6 on: August 31, 2013, 12:09:45 AM »
अहो सविता इतका प्रपंच कशाला /?इथे पोस्ट होणाऱ्या कविता वाचनार्यांनी स्वतः सुद्धा काही सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा ,इथे जे लिहील जाते ते सध्य स्थितीला अनुसरून असते ,त्यात कवींच्या भावना असतात ,म्हणजेच समाजात होणाऱ्या वाईट घटनांचा निषेधच त्यांनी नोंदविला आहे आपल्या कवितेतून . आणि पीडित व्यक्तीला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे ,त्यासाठी ती पीडिता समोरच असावी असे नाही ,वाचनार्यांनी सुद्धा स्वतःची जबाबदारी समजून शक्य तेवढा प्रचार प्रसार करावा ………।
                                 या माध्यमातून कमीतकमी वाचणार्या मध्ये जनजागृती झाली म्हणजे कवीच्या लिखाणाचे सार्थक झाले म्हणायला काही हरकत नाही !,,,,,,,,,संजय फारच छान !!!

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: उठूनं उभी रहा पुन्हा तू
« Reply #7 on: October 06, 2013, 10:15:02 PM »
thanx aspradhan and sweetsunita

Rohan tapse

 • Guest
Re: उठूनं उभी रहा पुन्हा तू
« Reply #8 on: January 27, 2014, 10:48:34 PM »
Khup mast ani sundar kavita ahe ashya kavita je bad days madhun gele ahet tya sathi bsnwa na.

Offline tej4790

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: उठूनं उभी रहा पुन्हा तू
« Reply #9 on: February 05, 2014, 10:17:42 PM »
अप्रतिम