Author Topic: एकलव्य मी  (Read 6006 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
एकलव्य मी
« on: August 27, 2013, 01:06:31 PM »
श्री अंबरीष देशपांडे सरांनी लिहिलेल्या "कल्लोळ झाला पुरे" ह्या कवितेवर मी "एकलव्य आम्ही" हि कविता लिहिली होती. त्यावर श्री अंबरीष देशपांडे सरांनी "मूळ कविता शार्दुल-विक्रीडित वृत्तात होती. निदान ते तरी शिकून घ्यायचं होतं" असा अभिप्राय दिला होता. अजाणतेपणे  वृत्ताची माहिती नसताना मी केलेली ती एक चूक होती. म्हणून आता शार्दुल-विक्रीडित बद्दल माहिती करून घेतली आहे आणि तीच कविता शार्दुल-विक्रीडित वृत्तात लिहून पोस्ट केली आहे.

वृत्त (शार्दुल-विक्रीडित)
गागागाललगा लगाल ललगा गागाल गागालगा
 
एकलव्य मी
 
केले काय असे, मलाच न कळे, वाटे न काही खरे
शब्दांनी विणले, विचार मनिचे, हे काय झाले गुन्हे?
नाही येथ, अम्हास ज्ञान कसले, लाभे गुरू ना इथे
मातीचे पुतळे, करून शिकतो, विद्या तरी मी इथे
 
नाही ताल तरी, मनास भिडती, शब्दातल्या भावना
मात्रा चाल इथे, अजून चुकते, माहित आहे मला
नाही खास जरी, विचार कुठले, काव्यात माझ्या इथे
यत्ने मी करतो, नवीन रचना, जाणून कर्तव्य हे
 
केले ना जर, यत्न खास कसले, साहित्य जन्मेल का?
हाती ना धरला, दिवा जर कधी, आदित्य जन्मेल का?
दृष्टी काव्य जरी, अम्हास न दिले, आशीष ते शारदे
सारे जाणुनही, मुळीच न ढळे, विश्वास माझा इथे
 
केदार ………   
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: एकलव्य मी
« Reply #1 on: August 31, 2013, 04:45:51 PM »
मस्त आहे,,  अप्रतिम !!!
 :)

Offline Ambarish Deshpande

 • Newbie
 • *
 • Posts: 13
Re: एकलव्य मी
« Reply #2 on: September 23, 2013, 09:48:18 AM »
Chhan prayatn. Kahi thikani Vrutta halate aahet..
Ya Vrutta madhe 2 L (Laghu) milun ek Guru hot nahi, he lakshat ghayve.. even majhyahi kavitet eka thikani ashi chuk aahe..

Vruttanna kaviteche sanskar samjave.. te achanak yet nahitach.. praytn karavech lagtat.. pan mulat shikaychi tayari nasel tar kuni kay karnar..
Tumhi shikaycha praytn kartay hach mool kavitecha uddesh aahe he laskat ghyave..

Jar kavitela LAY nasel tar to "DhaDa" / Lekh jhala.. nahi ka?

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: एकलव्य मी
« Reply #3 on: September 23, 2013, 12:26:14 PM »
Thank you sir,   praytn karin

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: एकलव्य मी
« Reply #4 on: September 24, 2013, 04:47:05 PM »
वा, केदार - खूपच सुरेख प्रयत्न आहे. आवडली ही रचना.

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: एकलव्य मी
« Reply #5 on: September 26, 2013, 12:39:46 AM »
ha kavitecha kuthala prakar ahe mi.shardul vikridit nav aaikun ahe pn farse dyan nahi plz he ky ahe mala savistar sangave

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: एकलव्य मी
« Reply #6 on: October 08, 2013, 04:30:47 PM »
मस्त प्रयत्न आहे...... :)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: एकलव्य मी
« Reply #7 on: November 10, 2013, 12:46:43 PM »
छान प्रयत्न, गुड लक....