Author Topic: मी कि माझ्यातील दुसरे कुणी ?  (Read 2108 times)

Offline ashwini dabholkar

  • Newbie
  • *
  • Posts: 23
  • Gender: Female
  • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही
मी कि माझ्यातील दुसरे कुणी ?

असे का होते
आपण श्वास घेतो
पण जगत असतो दुसर्यांसाठी

असे का होते
मन आपले असते
पण त्यात येणारे विचार नेहमी दुसर्याचे असतात

असे का होते
आपल्या इच्छा वेगळ्या असतात
पण दुसर्यांच्या इच्छेसाठी आपल्या इच्छा माराव्या लागतात

असे का होते
सर्व काही आपल्या जवळ असते
पण तरीही आपण दुसर्याच्या मागे धावत असतो

तेव्हा माज्या मनात विचार आला
मी `मी' आहे कि माज्यामधले दुसरे कुणी

                        कवियत्री  -  अश्विनी  दाभोळकर
                        ''निशब्द प्रेम" पेज अद्मीन इन फेसबुक