Author Topic: कविता  (Read 2544 times)

Offline ashwini dabholkar

  • Newbie
  • *
  • Posts: 23
  • Gender: Female
  • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही
कविता
« on: September 26, 2013, 11:39:29 AM »
कविता

जेव्हा कुणी हे नव्हते माझ्या सोबतीला
तेव्हा कविता होत्या माज्या संगतीला

कवितेत मन रमवून घेण्याची सवय झाली
नंतर स्वतःला कविता करायची इच्छा झाली

कळले नाही मला केव्हा या माझ्या मैत्रिणी झाल्या
कळले नाही मला कशा या माझ्या अंग वळणी पडल्या

माझ्या मनातले गुपित त्या माझ्या आधी समजू लागल्या
मनातले विचार शब्द होऊनी पानावर उतरवू लागल्या

काय जादू आहे या कवितांमध्ये माझे मला कळेना
माझ्या मनातील कविता काही केल्या मला उमजेना   

                                अश्विनी दाभोळकर,
                                `निशब्द प्रेम' अद्मीन 


 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
Re: कविता
« Reply #1 on: October 06, 2013, 01:39:00 PM »
Khoop Chan Aahe Kavita