Author Topic: आजी आजोबा  (Read 18916 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
आजी आजोबा
« on: October 29, 2013, 02:06:45 PM »
कधी रागावणारे, कधी हसलणारे.
तर कधी प्रेमाणे बोलणारे
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत असोत ना थोडे म्हातारे

रात्री झोपतांना नातवंडांना गोष्टी सांगणारे
पाठीतुन वाकलेले का असेनात
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत असोत ना थोडे म्हातारे

घरात नांदणारे, देवपूजेत दंगणारे
घराला घरपण आणणारे
म्हातारपणामुळे जर्जर झालेले का असेणात
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत असोत ना थोडे म्हातारे

मुलाला मार्ग दाखवणारे सूनेचे कौतुक करणारे
घराला आधार देणारे
सुरकुतलेल्या चेह-याचे का असेणात
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत असोत ना थोडे म्हातारे

Marathi Kavita : मराठी कविता

Trupti taral

  • Guest
Re: आजी आजोबा
« Reply #1 on: January 24, 2018, 09:17:01 AM »
Super ....