Author Topic: शब्द येतात तेव्हां .......  (Read 3981 times)

Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
शब्द येतात तेव्हां .......
« on: December 14, 2013, 03:03:14 PM »

जागे झालेत शब्द
जागवू लागले कवी
शब्द्प्रकाश घेऊन उगवू लागला
शब्दांचाच तो रवी

मग शब्दांचीच ती सुर्यकिरणे
शब्दच शब्द सारे
अंगालाही स्पर्शुनी जाते
शब्दांचे वारे

आकाशातुनी कोसळती रे
शब्दांच्याच धारा
शब्दच सर्व सांगतो मजला
निसर्ग तो हि सारा

त्या चांदणीच्या लुकलुकीतुनी
शब्दफुले सांडतात
मजसमोर शब्दांच्या ते
ओळी ओळी मांडतात

शब्दांचाच घेतला निवारा
बसलो त्याच्या छायेखाली
शब्दांचे हे घेऊनी दान
सरस्वती मज देण्या आली 

शब्दांच्याच त्या जोरावर
लिहित हे माझं मनं
शब्द हेच आहेत माझे
अनमोल ते धन .................

शब्द हेच आहेत माझे
अनमोल ते धन .................
 
                          -दि.मा.चांदणे
                           (९९७५२०२९३३)
              (chandanedipak06@gmail.com)

Marathi Kavita : मराठी कविता