Author Topic: नको विसरूस सावित्रीला  (Read 1771 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
नको विसरूस सावित्रीला
« on: January 03, 2014, 07:51:33 PM »
नको विसरूस सावित्रीला
=======================
समस्त स्रियांना जोतीरावांच्या साथीनं
शिक्षणाची द्वारे खुली करून दिली
हो … तो सोन्याचा दिन आजच आहे 
जी सावित्री जन्मास होती आली

खंर सांगा किती स्रियांना
या माउलीची आठवण झाली
तिलाच विसरून चाललीस तू
जिने तुझ्या भविष्याची तजवीज केली

शिकलीस तू हि आता
फार फार मोठी झाली
पुरुषाच्या खांद्यास खांदा लावून
तू घराची वेस ओलांडली

आज तुझी कीर्ती
साऱ्या जगांत पोहोचली
पण जी खरी होती सरस्वती
तिलाच तू विसरली

प्रत्येक क्षेत्रात तुझे नावं
तुझी छाया पसरली
विसरू नकोस त्या सावित्रीला
जिने शिक्षणाची ज्योत पेटविली .
======================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३.१.१४  वेळ : ७ .३० संध्या .   

Marathi Kavita : मराठी कविता