Author Topic: तूच कविता आहेस…. तुझ्यावर कविता काय करणार….  (Read 2278 times)

Offline prasad gawand

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
तूच कविता आहेस…. तुझ्यावर कविता काय करणार….

तुला पाहताच कविता सुचते
तुझ्यासाठी कविता काय करणार …
मी कविता लिहायला घेतली तर
माझे शब्द हि तुझे होवून जाणार ….

मृगजळासमान तू
तुला ह्या एकांताच्या वाळवंटात कसं शोधणार …
क्षितीजापलिकडचे अस्तित्व तुझे 
ह्या कवितेत कसं मांडणार ….

तुझ्यासाठी पुस्तक लिहलं तरी कमी आहे
मग तुला मोजक्या शब्दात कसं वेचणार …
तू लेखणीतून उमटलेल्या प्रतीमेसारखी
तुझी प्रतिमा ह्या कवीला कशी उमगणार ….

शिंपल्यातल्या मोत्यासारखी सुंदर तू
तुझी सुंदरता त्या शिंपल्या शिवाय कुणाला कळणार …
तूच एक सुंदर कविता आहेस
तुझ्यावर कविता काय करणार ….

- प्रसाद गावंड[/size]