मला पुन्हा लहान व्हायचंय
लोकांवर निस्सीम प्रेम करायला
निर्मळ, श्वेत मेघ बनायचंय
सुसाट वार्याशी झुंजायला
रंगीत छानसा पक्षी व्हायचंय
आकाशात उंच भरारी घ्यायला
मला जलाचा साठा व्हायचंय
तहानलेल्यांची तहान भागवायला
मला एक छान "मन" व्हायचंय
दुसर्या चांगल्या मनांशी बोलायला
मला एक छान "सुर" व्हायचंय
सर्वांच्या मनात उमटायला
मला मोठा वेडा व्हायचंय
वेड्या "शहाण्यांन्ना" लाजवायला
शक्य नसले काही जरी
निदान एक चांगला माणूस व्हायचंय....... निदान एक चांगला माणूस व्हायचंय......
~ ~ ~ ~ ~ ~ सुरज ~ ~ ~ ~ ~ ~