Author Topic: आयुष्य हे असेच असते  (Read 3655 times)

Offline hareshparab

  • Newbie
  • *
  • Posts: 5
आयुष्य हे असेच असते
« on: February 07, 2014, 04:01:09 PM »
फुलांचे आयुष्य छोटे असते
म्हणून त्याला कुस्करून मोडायचे नसते
आयुष्य सारे असेच असते
मरत मरत का होईना जगायचे असते 

थोडे ते सुखाचे क्षण
थोडे ते मन प्रफुल्लीत झालेले
हेच सारे आठवून हसायचे असते
मरत मरत का होईना जगायचे असते

नाती असतात सुखकर कधी
जीवनाला वळण लावणारी
येणाऱ्या वळणाला घाबरायचे नसते
मरत मरत का होईना जगायचे असते

दु:ख असतात खूपच भारी
कोणालाही न पेलणारी
अश्रुना आपल्या रुस्वयच असते
मरत मरत का होईना जगायचे असते

Hari

Marathi Kavita : मराठी कविता


Prajakta kathe

  • Guest
Re: आयुष्य हे असेच असते
« Reply #1 on: February 11, 2014, 10:54:48 AM »
Nice. Khup chhan kavita ahe.