Author Topic: कसे जगावं  (Read 3396 times)

Offline hareshparab

  • Newbie
  • *
  • Posts: 5
कसे जगावं
« on: February 14, 2014, 05:53:42 PM »
कसं जगावं तर अस जगावं
रडत असूनही हसत राहावं
दुखा:त असूनही सुखात राहावं

कसं जगावं तर अस जगावं
वादळा समोर पर्वता सारखा उभं राहावं
नदी वरले धरण बनाव

कसं जगावं तर अस जगावं
गांधीजीनचा बर्फ डोक्यावर ठेवून
सावरकरांच्या आगीत राहावं

कसं जगावं तर अस जगावं
ध्येया साठी काय वाटेल ते करावं
आपलं सर्वसं जणू अर्पुनी द्यावं

असं जगावं हे असंच जगावं
केवल श्वासा साठी नव्हे तर
जगण्यासाठी जगण असावं

Marathi Kavita : मराठी कविता


priyanka pralhad ogale

  • Guest
Re: कसे जगावं
« Reply #1 on: February 15, 2014, 08:43:06 AM »
 ;)