Author Topic: गोष्ट दोन बेडकाची  (Read 1489 times)

Offline कवि । डी.....

  • Jr. Member
  • **
  • Posts: 165
  • Gender: Male
  • कवितेसाठी जन्म आपुला
गोष्ट दोन बेडकाची
« on: February 25, 2014, 02:30:10 PM »
गोष्ट दोन बेडकाची
एक  होता आशावादी
दुसरा होता निराशावादी
एके  दिवशी काय झाले
दोघांना खुप भुक। लागली
चालून चालून रात्र झाली
 घरात घुसले दोघेही
एका माठात  दुध  दिसले
पिण्यासाठी  दुध त्यानी
माठात मारली उडी
दुध  पिऊन  झाल्यावर
बाहेर  त्यांना  येता  येईना
उड्या  मारून  दोघेही  थकले
निराशावादी  म्हणाला
दुध  पिऊन  मरून  जाऊ
पण  आशावादी  म्हणाला
मरेपर्यंत  उड्या  मारु
तो  उड्या  मारीत  राहिला
एक वेळ अशी  आली की
दुधाचे  दही  झाले
पायाला आधार  मिळाला
तो  झटकन  बाहेर  आला

।। कवि-डी।।

Marathi Kavita : मराठी कविता