Author Topic: माझी मराठी  (Read 1568 times)

Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
माझी मराठी
« on: February 27, 2014, 02:14:27 PM »
मराठी आमचं माहेर
इंग्रजी हा तर इंग्रजांचा आहेर

पण .. मराठीची गोडी सांगा त्याला कधी येईल का ?
आणि इंग्रजी शिकली म्हणून कोणी मराठी विसरून जाईल का?

नात्यातला तो ओलावा मराठी शिवाय सांगा कळला असता का?
आई मधल्या आत्मा आणि ईश्वराचा मिलाप सांगा कधी जुळला असता का?

फक्त मराठीच नाव घेतल्यावर
मन कसं नाचायला लागत
भिरभिरणार मन
लहान मुला सारख वागत

कारण मराठी हे नाव  त्याच्यासाठी खूप काही होतं
म्हणून शब्द मनात नाचत होते
खरं सांगतो मित्रहो मराठी मुळेच हे शब्द सुचत होते

                                                 -   दि.मा.चांदणे
                                                  (9975202933)


Marathi Kavita : मराठी कविता