Author Topic: स्त्री म्हणजे सखी तु  (Read 1990 times)

Offline swami sakha

  • Newbie
  • *
  • Posts: 6
स्त्री म्हणजे सखी तु
« on: March 08, 2014, 11:56:44 AM »
सखी  !! आज जागतिक महिला दिन . माझ्या आयुष्यात माझा जन्मापासूनच मला स्त्रीचे प्रेम भरभरून मिळाले . मला नऊ महिने गर्भात सांभाळून मला आईने हे जग दाखविले. माझ्या बहिणीने मला खूप खूप प्रेम दिले . माझ्या बायकोने मला साथ देवून माझे एकाकी आयुष्य सुंदर बनविले. आणि आता माझ्या दोन मुली इतक्या प्रेम करतात की अगदी फुलासारख्या जपतात. काळजी घेतात अजून काय पाहिजे !!!!
सखी !!जागतिक महिला दिनानिमित्त मनापासून शुभेच्या आणि तुझ्या ह्या कर्तुत्वाला माझा मानाचा मुजरा!

सखी स्त्री म्हणजे जननी ,माता, वेळ पडली तर दुर्गा, कालिका माता , भगिनी
जन्मापासून आयुष्याचा प्रत्येक युद्धात नं डगमगता अजिंक्य ठरणारी रणरागिणी

स्त्री म्हणजे डोळे दिपवून टाकणारे तेजस्वी तेज तर चंद्राची शीतलता
स्त्री म्हणजे ममतेचे मूर्तिमंत उदाहरण , एक अपार शालीनता

स्त्री म्हणजे एक अभेद्य वज्रास्त्र , असंख्य संकटांच वादळ हसत हसत झेलून
आपल्या पिल्लांना , आपल्या माणसांना मायेने जपणारं एक व्यक्तिमत्व

स्त्री म्हणजे परिपक्व माता , शिवबा घडवणारी आदर्श जिजामाता ,
जुलामांवर तुटून पडणारी शूर राणी लक्ष्मिबाई ,बालमनावर आदर्श संस्कार घडविणारी श्यामची आई ,

स्त्री म्हणजे शिक्षणाची धुरा सांभाळणारी सावित्रीबाई फुले आनंदी बाई
चंद्रावर लक्ष्मिचं पाऊल टाकणारी ती ही एक स्त्रीच म्हणजे बाईच

स्त्री म्हणजे अपार कष्ट सोसून , पोटाची खळगी भरण्यासाठी दगडं फोडून
आपल्या पाठीवर तान्हं पोर बांधून त्याला कष्टाच्या रक्ताचं स्तनपान देणारी सोशिक बाई

स्त्री म्हणजे दुधावरची मऊ साय , चंद्राची शीतलता , रातराणीच्या फुलांचा मधुर सुगंध ,
अमृत वाणी , सुरेल गान, पहाटेची भूपाळी, कोकिळेचे गान , जगण्याचा श्वास , कस्तुरीचा गंध

स्त्री म्हणजे संसाराचं चाक होवून पतीच्या खांध्याला खांदा लावून संकटं झेलणारी जीवनसाथी
नं थकणारी , वेळ पडली तरी संसारच्या रथाला नेटाने पुढे नेणारी धैर्यशील सारथी

स्त्री म्हणजे चंदनापरी झिजणारी त्यागाची मूर्ती , सर्व निमुटपणे सहन करणारी अबला
स्त्री म्हणजे सती अनुसूया, पतीच्या चितेवर उडी घेणारी धाडसी सती, पवित्र अहिल्या

स्त्री म्हणजे २१ व्या शतकांत सर्व क्षेत्रांत अग्रेसर ठरणारे एक झंझावाती वादळ , एक कुशल नेतृत्व
स्त्री म्हणजे पुरुषालाही लाजवेल असं जगत मान्य व्यक्तिमत्व

स्त्री म्हणजे एक गोड सखी मैत्रीच्या नात्याचे मर्मबंध प्रेमाने जपणारी
तिची साथ नेहमीच हवीहवीशी वाटणारी, सुःख दुःखात साद घालणारी

स्त्री म्हणजे सखी तु !! मैत्रीचे हे पवित्र नाते जे तु आणि मी अखंडपणे जोपासण्याचे
व्रत घेतले आहे , जे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत असेच चालू राहणार आहे

-- सुनील ..........
८७६७५६१७८२

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
Re: स्त्री म्हणजे सखी तु
« Reply #1 on: March 09, 2014, 10:56:42 AM »
Nice ............................very nice.........................