Author Topic: कविता म्हणजे ..........  (Read 1430 times)

Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
कविता म्हणजे ..........
« on: March 08, 2014, 12:42:04 PM »
कविता लिहिणं हे एक वेड आहे
त्यात लिहील तेवढं थोडं आहे

कविता म्हणजे ....
देवाने मनात लावलेलं शब्दांच रोप आहे
कविता म्हणजे ....
शब्दांचा लयबध्द विणलेला गोप आहे

कविता म्हणजे ....
सजीव निर्जीवांची व्यथा सांगणारी कथा आहे
कविता म्हणजे ....
थोरा मोठ्यांचे विचार सांगणारी गाथा आहे

कविता म्हणजे ....
कधी कधी वास्तव पाहून मनाला लागलेली आग आहे
कविता म्हणजे ....
वाईटाबद्दल लेखणीतून कागदावर उतरलेला राग आहे

कविता म्हणजे ....
अन्यायावर केलेला घाव आहे
कविता म्हणजे ....
प्रेमाचाच गाव आहे

कविता म्हणजे ....
अचूक लावलेला नेम आहे
आणि कविता म्हणजे ....
सर्व चांगल्या गोष्टीवर केलेलं प्रेम आहे.
                                               -दि.मा.चांदणे
                                              (९९७५२०२९३३)
                                   (chandanedipak06@gmail.com)


Marathi Kavita : मराठी कविता