Author Topic: जगण्याची मजा घेत जा  (Read 2763 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
जगण्याची मजा घेत जा
« on: March 15, 2014, 09:41:31 PM »
एक एक पाऊल पुढे टाकत जा
हळूहळू रस्ता कापत जा
इकडे तीकडे पाहत जा
जगण्याची मजा घेत जा !!

मनाशी वाटेल ते बोलत जा
भेटेल त्याला सोबत घेऊन जा
धेयाचा मार्ग शोधत जा
जगण्याची मजा घेत जा !!

स्वप्नाला धेय समजत जा
श्वासाला ताकत बनवत जा
नशीबाला मागे टाकत जा
जगण्याची मजा घेत जा !!

पुढे जाताना मागे पाहत जा
मागच्या चुका सुधारत जा
मार्गातील काटा काढत जा
जगण्याची मजा घेत जा !!

$ vidyakalp $

Marathi Kavita : मराठी कविता