Author Topic: अरे मतदार राजा.....  (Read 1478 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
अरे मतदार राजा.....
« on: April 15, 2014, 08:00:19 AM »
     अरे मतदार राजा.....

अरे मतदार राजा
राजाचा तु अर्थ जान
एका एका मताने पण
पडेल सत्याचा प्रकाश महान
ओळख तु माणसाला
माणसातील प्रामानिकपणाला...
सत्याची पेटवूनी मशाल
दुर कर तु अंधाराला....
नको बळी पडू अमीशाच्या,होऊनी तु लाचार
विकु नको तु स्वताच्या उज्वल भविष्याला....
येतील दारात तुझ्या
मतांनची भिक मागायला
देतील पुन्हा नवी आश्वाशने ते तुला...
घेता आले तर घेतील विकत तुला
नाही तर देतील खोटी वचने पुन्हा.
विकासाच्या मार्गावरती पेरु नको तु काटे
जाशील जेव्हां पुढे-पुढे तु
टोचु नयेत ते तुला.....
एका एका मताने बनेल देश महान
म्हणुन तु दे रे ,सत्याच्या हातामध्ये कमान...
विसरु नको तु देशासाठी, लढलेल्या स्वातंत्र विरांना
त्यांनी दिलेल्या बलीदानांना....
एका एका मताने सुद्धा वाहील विकास गंगा
एका-एका थेंबाने पन फुटतो अकुंर नवा नवा.
एक-एक लावुनी पनती
करुया प्रकाश सोहळा......
Marathi Kavita : मराठी कविता


kanno dinesh

  • Guest
Re: अरे मतदार राजा.....
« Reply #1 on: April 17, 2014, 10:05:03 PM »
KHUP CHAN.