Author Topic: पुन्हा एकदा.....  (Read 2183 times)

Offline sudhanwa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
  • Gender: Male
पुन्हा एकदा.....
« on: April 27, 2014, 03:09:58 PM »
चिनी लांघतो, सिमा तंग
व्हावा पुन्हा एकदा सुभाषचंद्र

देश फोडतो, राज्यकर्ता धिंग
व्हावा पुन्हा एकदा भगतसिंग

धर्म विसरला, समाज अंध
व्हावा पुन्हा एकदा विवेकानंद

जातीभेद, भिनला रक्तभर
व्हावा पुन्हा एकदा सावरकर

बोध विसरला, अशिक्षित धन्य
व्हावा पुन्हा एकदा लोकमान्य

अब्रूचा धसका घेरता, ताई
व्हावी पुन्हा एकदा राणी लक्ष्मीबाई

उद्विग्न मनांचा पाया खचतो
व्हावा पुन्हा एकदा आॅरोबिंदो

दुफळी माजते या प्रांत-सीमांना
व्हावा पुन्हा एकदा मौलाना

उथळ गीत रचतो, लेखणी मंद
व्हावा पुन्हा एकदा बंकीम चंद्र

नेत्रृत्वहीन देश भेसूर
व्हावा पुन्हा एकदा लाल बहादुर

अंधश्रद्धेचा पगडा सर्वांवर
व्हावा पुन्हा एकदा दाभोळकर
व्हावा पुन्हा एकदा दाभोळकर
                                     - सुधन्वा

Marathi Kavita : मराठी कविता