Author Topic: माणुस बंदीवाना सारखाच जगत असतो.  (Read 1646 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
      माणुस बंदीवाना सारखाच जगत असतो.

सीमा असतात धर्माच्या,
सीमा असतात निती नियमांच्या,
विचारांच्या चौकटीत,
माणुस नेहमी बंदच असतो.
प्रत्येक माणुस बंदीवानच असतो.
कही माणसानी स्वतावर घातलेल्या सीमा
तर काहीनां दुस-यांनी लादलेल्या सीमा
प्रत्येकासाठी सीमा चाकोरीचे तुरुगंच असते,
प्रत्येक माणुस बंदीवाना सारखे जगत असते.
सीमोऊल्लोघंना साठी प्रत्येक माणुस,
तडफडत असतो.
 माणुस बंदीवाना सारखाच जगत असतो.
खोटी प्रतीष्टा, खोटे हसू,आणुन
तो विटलेला  असतो.
माणुस बंदीवाना सारखाच जगत असतो...