Author Topic: रे मना....  (Read 1674 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
रे मना....
« on: May 03, 2014, 11:07:18 AM »
जाण तू स्वतःला
तूच सर्व काही आहेस रे
तूच खास तूच श्वास
सर्व काही तुच रे
*
जागवी विश्वास स्वतःचा
कमी न त्याला मान रे
विश्वास देईल साथ मनाला
अंतिम होईल साध्य रे
*
पराभवाने तू खचू नको
तोल मनाचा ढळू नको रे
यत्नाची तू शिकस्त कर
माघार कधी तू घेऊ नको रे
*
मन हि अद्वैत शक्ती
मनास सर्वस्व मान रे
मनास आदेश मानुनी
करी जागरूक मनास रे
*
मन परमात्मा मन शक्ती मोठी
कर मन तुझे कणखर रे
मन हेच अंतिम सत्य
घे पारखून स्वतःच रे

श्री. प्रकाश साळवी दि. ०३ मे २०१४.

Marathi Kavita : मराठी कविता