Author Topic: कविता कशी असावी  (Read 2040 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
कविता कशी असावी
« on: May 03, 2014, 06:40:55 PM »
कविता लिहिणे इतकपण सोप नाय .
शब्द काय टमाट्याच रोप नाय
जे घेतल वाफ्यातुन अन सरींमध्ये पेरल
शब्द असावेत मनातल्या भावना ,आनंदी दिसुनही मनातल्या वेदना
कविता असावी आधार देणारी
झालेच दु:ख तर दु:खी मनाला सुख देणारी
रस्ता चुकलेल्या वाटसरुला मार्ग दावणारी
कविता असावी मन कोणाच तरी जिंकणारी
कविता नसावी ह्दय चोरणारी
झाली कधी प्रित तर प्रेम व्यक्त करणारी
सोडून गेल कोणी तर विरह दुर करणारी
कविता असावी अन्यायाच्या घराला वाचा फोडणारी,
माणसाला माणुसकी मिळवून देणारी
कविता असावी शब्दाच्या रुपाने ह्रदयात बसणारी
आनंदाच्या नादात हास्य फुलवणारी
कविता असावी डोक्यावरचा ताण दुर करणारी
रोजच जगण सोडून भरकटत जाणारी
कविता असावी आनंदी जीवणातली
कविता असावी मनातली ....

#सचिन मोरे#

Marathi Kavita : मराठी कविता