Author Topic: माती साठी तुम्ही आपसात का रे भांडता  (Read 1595 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65


शब्द संपतात जेथे जेथे
श्वासांचे राहील सोबत नाते ।

मुक्या भावनांचा आधार जेथे,
मना मनांचे राहील नाते ।

संपून जातात वैभव सुख जेथे ,
दुखःच तर होते आधाराचे नाते ।

सांगाव लागत नाही मनाला,
शब्द विरून जातात तेथे

दुखःच दुखःचा आधार बनते ।
मग सांगावे लागत नाही

आंधाराला सावलिशी नाते ।
एकच तर आहेत वेदनांचे झरे,

मानसांना समजावी मानसांची मती
गती तेथे येवो नये आडवी ।

जोडावी प्रेमाची नाती
मातीतच वाट आपली,

मातीच माता
माती साठी  तुम्ही का आपसात भांडता ।

« Last Edit: August 27, 2014, 11:05:01 PM by SONALI PATIL »